Media

[ 30 APR ‘13 ]
महाराष्ट्र टाईम्स

अँग्री यंग रक्षक!

मराठी सिनेमा , बॉलिवुड आणि हॉलिवुड गाजवल्यानंतर राजेश श्रुंगारपुरे टीव्हीवर परततोय तोही एका दणकेबाज टायटल रोलमधून! या मालिकेचं नाव आहे रक्षक. डोल्लेशोल्ले कमावलेल्या राजेशची धडाकेबाज अॅक्शनही यात दिसेल.

हिंदी सिनेमा , मालिका , मराठी सिनेमा , हॉलिवुड अशा वेगवेगळ्या क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर राजेश श्रुंगारपुरे हा मराठमोळा कलाकार एका नव्या हिंदी मालिकेतून पुन्हा लोकांसमोर येणार आहे. ' लाइफ ओके ' च्या ' रक्षक ' या नव्या मालिकेत तो थेट रक्षकाच्याच भूमिकेत असेल. दोन वर्षांनी राजेशने स्मॉलस्क्रीनच्या दिशेने यू टर्न घेतलाय.

या मालिकेचं स्वरुप पूर्णतः वेगळं असल्याचं समजतं. एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराचा शोध घेणं अशा पद्धतीची मांडणी या मालिकेची नाही. तर एखाद्या घटनेमुळे सामान्य लोकांवर जो परिणाम होतो , त्याची परतफेड हीच सामान्य जनता कशी करू शकते त्याचं चित्रण यात दिसणार आहे. ' गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. तसंच समाजात जे चुकीचं घडतंय त्याविरोधात आपण सर्वांनी उभं राहायलाच हवं. सामान्य माणसांमध्ये राहूनच आपण असामान्य लढा कसा देऊ शकतो , हेच या मालिकेतून दाखवलं आहे. मी खूप वर्षांनी चांगल्या विषयामधून टीव्हीवर परतलोय. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. ' रक्षक ' समाजातल्या सर्वसामान्य लोकांना खूप शिकवून जाईल ', असा विश्वास राजेशला बोलताना व्यक्त करतो.


[ 14 JAN ‘13 ]
Murder 3

Murder 3 is an upcoming Indian thriller film and the sequel to the 2011 film, Murder 2. The film will release in February 15, 2013.. This is the third installment in the Murder series.

Starring : Rajesh Shringarpore,Randeep Hooda,Aditi Rao Hydari and Sara Loren

Directed By : Vishesh Bhatt
Produced By : Mahesh Bhatt
Written By : Mahesh Bhatt